
एका माणसाला त्याच्याच बायकोवर अत्याचार केल्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. त्याला बायकोकडून एका सेक्स फँटसीची अपेक्षा होती, मात्र त्या अपेक्षेपायी एका महिलेवर अनर्थ ओढवला आहे.
हे प्रकरण सिंगापूर इथलं आहे. या जोडप्याचा 23 वर्षांपूर्वी विवाह झाला असून त्यांना तीन मुलं आहेत. पाच वर्षांपूर्वी नवऱ्याच्या कार्यालयात एक सहकारी आला. या सहकाऱ्याला त्याने आपल्या लैंगिक कल्पना सांगितली. त्याला आपल्या पत्नीला परपुरुषाशी लैंगिक संबंध ठेवताना पाहायची इच्छा होती. या विषयावर बोलता बोलता त्याने आपल्या त्या सहकाऱ्याला हे भीषण कृत्य करण्यास राजी केलं. 31 डिसेंबर 2017 रोजी त्याने त्या सहकाऱ्याला घरी बोलावलं.
त्या रात्री त्याने आपल्या सहकाऱ्याला घरी बोलवलं. त्यानंतर त्याने बायकोसोबत दारू घेतली. तिच्या दारूच्या ग्लासात गुंगीचं औषध मिसळून त्याने तिला बेशुद्ध केलं. त्यानंतर त्याने तिच्याशी लैंगिक संबंध ठेवले. त्याच्या सहकाऱ्याने तिच्यावर बलात्कार केला. मात्र, याची सुतराम कल्पना बेशुद्ध महिलेला आली नाही. या वेळी त्यांची मुलं आणि घरातील नोकर घराच्या दुसऱ्या भागात झोपले होते.
2020मध्ये या महिलेला आपल्या नवऱ्याच्या फोनमध्ये तिचे काही आक्षेपार्ह फोटो सापडले. त्या फोटोत तिच्यासोबत अन्य एक पुरुष लैंगिक अत्याचार करत असल्याचं तिला दिसलं. त्याचा जबर धक्का बसलेल्या महिलेने पोलिसात धाव घेऊन नवरा आणि त्याच्या सहकाऱ्याविरोधात तक्रार दाखल केली.
या प्रकरणी नवरा आणि त्याच्या सहकाऱ्याला तीन वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. कारण, नवऱ्याच्या सहकाऱ्याने बलात्कार केल्याचा पुरावा सिद्ध होऊ शकला नाही. त्यामुळे त्याला उपलब्ध पुराव्यांआधारे शिक्षा ठोठावण्यात आली.




























































