रस्ता चुकला टँकर, हैदराबादमध्ये ऑक्सिजन अभावी 7 रुग्णांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना ऑक्सिजनचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. हैदराबादमध्ये वेळीच ऑक्सिजन न मिळाल्याने 7 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

हैदराबादच्या किंग कोटी रुग्णालयात ऑक्सिजनचा तुटवडा होता. रुग्ण, डॉक्टर, रुग्णांचे नातेवाईक ऑक्सिजनची वाट पाहत होते. इकडे आयसीयूमध्ये ऑक्सिजन हळू हळू कमी झाला आणि रुग्णांचा श्वास अडकला. थोड्याच वेळात रुग्णालयातील संपूर्ण ऑक्सिजन संपला आणि त्यात 7 रुग्णांचा मृत्यू झाला.

दुपारीच ऑक्सिजनचा तुटवडा जाणवू लागला तेव्हा अधिकार्‍यांनी रुग्णलायातील ऑक्सिजन भरण्याचे आदेश दिले. परंतु ऑक्सिजनचा टँकर घेऊन येणारा चालक रस्ता विसरला आणि यायला उशीर झाला. पोलिसांनी मोठ्य मेहनतीने टँकर शोधून काढला. पण तेव्हा खूप उशीर होऊन गेला होता. या दुर्घटनेत 7 रुग्णांचा मृत्यू झाला होता.