हैदराबादेत तीन फ्लाइट्सला बॉम्बने उडवण्याची धमकी

सप्टेंबर 2025 मध्ये जीएसटी कमी झाल्याने काही वस्तू स्वस्त झाल्या होत्या. यामध्ये स्मार्ट टीव्हीचाही समावेश होता. स्मार्ट टीव्हीवर पूर्वी 28 टक्के जीएसटी लागायचा, तो आता 18 टक्के झाला आहे. मात्र टीव्हीच्या किमती आता पुन्हा महाग होण्याची शक्यता आहे. याचे कारण म्हणजे घसरणारा रुपया आणि स्मार्ट टीव्हीमध्ये वापरली जाणारी एआय चिप. रुपयाचे अवमूल्यन होत आहे. रुपया डॉलरच्या तुलनेत 90 पार पोहोचला आहे. त्यामुळे ज्या वस्तू आयात केल्या जात आहेत त्यांच्यावर परिणाम होणार आहे. मेमरी चिप्सच्या किमती महाग झाल्याने आणि रुपया घसरल्यामुळे जीएसटीचा जो फायदा मिळत होता तो आता संपुष्टात येणार आहे. मागील चार महिन्यांत मेमरी चिप्सची किंमत सहापटीनं वाढली आहे. त्यामुळे टीव्हीच्या किमती वाढतील. परिणामी टीव्हीची मागणी कमी होऊ शकते. गेल्या काही काळापासून मार्केटमध्ये फ्लॅश मेमरीची कमतरता आहे. त्यामुळे केवळ टीव्ही मार्केटच नव्हे तर स्मार्टफोन मार्केटवरही परिणाम दिसत आहे. जाणकारांच्या मते, DDR3 आणि DDR4 मेमरी चिप्सचा पुरवठा कमी झाला आहे. याचे कारण म्हणजे एआय डेटा सेंटर. मागणीच्या तुलनेत एआय चिप्सचा पुरवठा कमी होत आहे.