धाडसाला सलाम! माय-लेकी चोरांना भिडल्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हैदराबाद शहरातील एका कॉलनीत दरोडा टाकण्यासाठी आलेल्या दोन चोरांना माय-लेकाRनी चांगलाच इंगा दाखवला. दरोडा टाकण्यासाठी हे दोघे घरात घुसले त्यावेळी घरात मुलगी आणि तिची आई अशा दोघीच होत्या. दरोडा टाकण्याच्या उद्देशाने आलेल्या दोघांजवळ बंदुकीसह इतर शस्त्रs होती. मात्र, तरीही न घाबरता माय-लेकी थेट चोरांना भिडल्या. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱयामध्ये कैद झाली. आता या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही घटना घडल्यानंतर हैदराबाद पोलिसांनी तात्काळ आरोपींना बेडय़ा ठोकल्या आहेत. सशस्त्र दरोडेखोरांशी लढलेल्या या माय-लेकाRच्या धाडसाचे अनेकांनी कौतुक केले आहे.

दरोडा टाकण्यासाठी आलेल्या दोन व्यक्तींनी बंदुकीचा धाक दाखवत घरात घुसण्याचा प्रयत्न केला. यावेळी अमिता महनोत आणि त्यांच्या मुलीकडे बंदूक रोखत घरातील पैसे आणि सोन्याच्या वस्तू दरोडेखोरांनी मागितल्या. या माय-लेकीनी चोरांना चांगलाच धडा शिकवला. घरात शिरलेल्या दोघांपैकी एकाला पकडत चांगलाच चोप दिला. तर एकजण पळून जाण्यास यशस्वी ठरला. या दोन चोरांपैकी एकाचे नाव सुशील कुमार आणि दुसऱयाचे नाव प्रेमचंद्र आहे.

पोलिसांकडून माय-लेकीचा सत्कार

पोलीस उपायुक्त रोहिणी प्रियदर्शिनी यांनी अमिता महनोत आणि त्यांच्या मुलीचा सत्कार करत माय-लेकाRच्या धाडसाचे कौतुक केले आहे.

दरोडा पूर्वनियोजित

दरोडा टाकण्यासाठी ज्या घरी चोर आले, त्याच घरी चोर काही वर्षांपूर्वी काम करत होते. त्यांनी काही दिवस तेथे काम केले. या दरोडेखोरांना त्या घरातील सोन्याच्या वस्तू आणि घरातील पैसे नेमके कुठे ठेवतात? याबाबत माहिती समजल्यानंतर ते काम सोडून पळून गेले होते. त्यानंतर त्यांनी थेट घरात दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला. हे दरोडेखोर कुरिअर देण्याच्या बहाण्याने घरात शिरले. दोघांपैकी एकाने आपली ओळख पटू नये, या हेतूने हेल्मेट घातले होते. सध्या दोन्ही आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत.