
महिलांनी मोकळेपणाने जगावे असे म्हणत मराठी अभिनेत्री हेमांगी कवी (Hemangi Kavi) हिने गरज नसताना ‘ब्रा’ची बंधने का स्वाकारावी असा सवाल फेसबुक पोस्टद्वारे उपस्थित केला. या पोस्टचे कौतुक होत असतानाच हॉलिवूड अभिनेत्री गिलियन अँडरसन (Gillian Anderson) हिने आयुष्यात कधीही ब्रा घालणार नसल्याची शपथ घेतली आहे. इन्स्टाग्राम या सोशल मीडिया माध्यमावर Q+A (प्रश्न आणि उत्तरं) मध्ये बोलताना गिलियन अँडरसन हिने हा निर्धार केला आहे.
मी खूप आळशी झाली आहे आणि यापुढे ब्रा घालू शकत नाही. लॉकडाऊन संपल्यानंतरही आपण आता ब्रा घालणार नसल्याचे गिलियन अँडरसन हिने म्हटले आहे. मग भलेही माझे स्तन माझ्या बेंबीपर्यंत पोहोचले तरी चालतील, मला त्याची पर्वा नाही. तसेच मला हा अस्वस्थपथा झिडकारून द्यायचा आहे, असेही गिलियन म्हणाली.
दरम्यान, गिलियन हिच्या ब्रा न घालण्याच्या निर्णयावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काहींनी तिला पाठिंबा दिला आहे, तर काहींनी हे विचित्र असल्याचे म्हटले आहे. एका व्यक्तीने जर दोन वेळा गोल्डन ग्लोब आणि एमी अवॉर्ड जिंकणारी अभिनेत्री ब्रा घालणार नसल्याचे म्हणत असेल तर आपण तिच्या निर्णयावर असहमती दर्शवणारे कोण आहोत, असे म्हटले आहे. तर एका महिलेने हा निर्णय आनंददायक असून मी देखील ब्रा घालत नसल्याचे म्हटले.
‘नो ब्रा डे’ साजरा केला पाहिजे! अभिनेत्री हेमांगी कवीच्या पोस्टनंतर तृप्ती देसाईंनी मांडले मत
गिलियन अँडरसन ही एक ब्रिटीश-अमेरिकन अभिनेत्री आहे. ‘ द एक्स-फाइल्स’ या मालिकेद्वारे तिला विशेष ओळख मिळाली. यानंतर तिने ‘द हाउस ऑफ मिर्थ’ (2000), ‘द माइटी सेल्ट’ (2005), ‘द लास्ट किंग ऑफ स्कॉटलँड’ (2006, ‘द एक्स फाइल्स’ (1998) आणि ‘द एक्स फाइल्स: आय वॉण्ट टू बिलिव्ह’ या चित्रपटांमध्ये भूमिका केल्या.




























































