
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर हल्लाबोल करत म्हटले आहे की, “माझ्याकडे अमित शहा यांच्याविरुद्ध पुरावा असलेली पेन ड्राइव्ह आहे. मी सामान्यतः प्रतिक्रिया देत नाही, पण मला छेडले तर मी सोडणार नाही!” कोलकाता येथे ईडीच्या छाप्यांच्या विरोधात काढलेल्या रॅलीनंतर त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.
रॅलीत बोलताना ममता बॅनर्जी म्हणाल्या की, “कोळसा घोटाळ्याचा पैसा सुवेंदु अधिकारी यांनी वापरला आणि तो अमित शहा यांच्यापर्यंत पोहोचला. याची साखळी आहे. जयगणेश ते सुवेंदु ते अमित शहा, माझ्याकडे याचे पुरावे पेन ड्राइव्हमध्ये आहेत. मी अजून शांत आहे कारण मी मुख्यमंत्री पदाचा आदर ठेवते. पण जास्त दबाव आला तर मी हे सर्व उघड करेन.”
त्यांनी ईडीला ‘एक्सटॉर्शन डायरेक्टोरेट’ म्हटले आणि आरोप केला की, “ही कारवाई टिएमसीची निवडणूक रणनीती, उमेदवार यादी आणि डेटा चोरण्यासाठी आहे. अमित शहा हे नास्टी, नॉटी गृहमंत्री आहेत, जे देशाचे रक्षण करू शकत नाहीत, पण आमची कागदपत्रे चोरायला ईडीला पाठवतात,” असेही त्या म्हणाल्या.































































