मी शहेनशाह नाही

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

मी कोणी शहेनशाह किंवा हुकूमशाह नाही. लोकांकडून मिळणाऱ्या प्रेमातून मला बळ मिळते, असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान मोदी यांच्या सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आली आहे. त्यांच्या जिवाला सर्वाधिक धोका असल्याचे गृह मंत्रालयाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनेत म्हटले आहे. मंत्र्यांनाही थेट पंतप्रधानांना भेटता येणार नाही. एका ऑनलाइन मासिकाला दिलेल्या मुलाखतीत या सुरक्षेबाबत विचारलेल्या प्रश्नावर पंतप्रधान बोलत होते.

मी जनतेपासून दूर राहणारा कोणी शहेनशाह किंवा हुकूमशाह नाही. माझ्या स्वागतासाठी लोक रस्त्यावर उभे राहतात. त्यावेळी मी कारमध्ये बसून राहू शकत नाही. जास्तीत जास्त लोकांची भेट घेणे मला आवडते, असे ते म्हणाले. मला हटविण्यासाठी विरोधक एकत्र येत आहेत. ही महाआघाडी केवळ राजकारण आणि स्वहिताने प्रेरित आहे, अशी टीका त्यांनी केली.