ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानच्या F-16, JF-17 सह 10 लढाऊ विमानं पाडली! हवाई दल प्रमुखांची माहिती

ऑपरेशन सिंदूरमध्ये हिंदुस्थानच्या हवाई दलाने पाच पाकिस्तानी F-16 आणि JF-17 ही लढाऊ विमानं पाडली होती. हवाई दल प्रमुख एपी सिंग यांनी स्वतः ही माहिती उघड केली आहे. येत्या 8 ऑक्टोबरला 93वा हवाई दल दिन आहे. हवाई दलाच्या हिंडन तळावर या दिवशी भव्य कार्यक्रम होणार आहे. यावेळी होणाऱ्या परेडमध्ये राफेल, सुखोई लढाऊ ही विमानं चित्तथरारक प्रात्यक्षिकं दाखवणार आहेत. यासोबत 18 इनोव्हेशन दाखवले जाणार आहेत. हा कार्यक्रम म्हणजे एक प्रकारे ऑपरेशन सिंदूरच्या यशाचे सेलिब्रेशन असेल. ऑपरेशन सिंदूरमध्ये हवाई दलाने 300 किमी अंतरावरून अचूक मारा करत लक्ष्य टिपली होती.

९३ व्या हवाई दल दिनाच्या भव्य समारंभाची जय्यत तयारी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर हवाई दल प्रमुख एपी सिंग यांनी ऑपरेशन सिंदूरबाबत मोठी माहिती उघड केली. ऑपरेशन सिंदूरमध्ये हिंदुस्थानच्या हवाई दलाने पाच पाकिस्तानी F-16 आणि JF-17 विमाने पाडली, असे सिंग यांनी सांगितले.