तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली, 20 वर्षांत 23 बदल्या! आता मिळाली ही जबाबदारी

सामान्यांमध्ये लोकप्रिय असलेले प्रशासकीय अधिकारी तुकराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली झाली आहे. ते आता राज्याच्या दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव असतील. गेल्या 20 वर्षातली ही त्यांची 23 वी बदली आहे. तुकाराम मुंढे हे असंघटीत कामगार विभागाच्या आयुक्तपदी कार्यरत होते. मुंढे यांच्यासोबत आणखी चार अधिकाऱ्यांच्याही बदल्या झाल्या आहेत.

या अधिकाऱ्यांच्या झाल्या बदल्या

1. तुकाराम मुंढे यांची असंघटीत कामगार विभागाच्या आयुक्तपदावरून त्यांना दिव्यांग कल्याण विभागाच्या सचिव पदी नियुक्त करण्यात आले आहे.

2. नितीन काशीनाथ पाटील यांना महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक विपणन महासंघांच्या व्यवस्थापकीय संचालक पदावरून राज्य कर विभागाचे विशेष आयुक्त म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

3. अभय महाजन यांची राज्य कर विभागाच्या विशेष आयुक्त पदावरून महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक विपणन महासंघाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

4. ओंकार पवार यांची इगतपुरी उपविभाग, नाशिकच्या सहाय्यक जिल्हाधिकारी पदावरून नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर नियुक्त करण्यात आले आहे.

5. आशा अफजल खान पठाण – सहसचिव, मुख्यमंत्री सचिवालय, नागपूर यांना महासंचालक, वनमती, नागपूर म्हणून नियुक्त करण्यात आले आहे आणि त्यांना सहसचिव, मुख्यमंत्री सचिवालय, नागपूरचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे.