राज्यात पाच IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, विवेक जॉन्सन बीडचे नवे जिल्हाधिकारी

राज्यात आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या सुरुच आहेत. मंगळवारी आणखी पाच अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यातच बीड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांची बढती देण्यात आली आहे. त्यांना मत्स्यव्यवसाय विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्त करण्यात आले आहे. तर बीड जिल्हाधिकारीपदी चंद्रपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यातच कोणत्या धिकाऱ्यांची कुठे बदली झाली हे, जाणून घेऊ…

1. अभिषेक कृष्णा (आयएएस: आरआर: 2006) सदस्य सचिव, महा. जीवन प्राधिकरण मुंबई यांची संचालक, महानगरपालिका प्रशासन, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

2. अविनाश पाठक (आयएएस: एससीएस: 2013) जिल्हाधिकारी, बीड यांना व्यवस्थापकीय संचालकपदी, मत्स्यव्यवसाय विकास महामंडळ, मुंबई नियुक्त करण्यात आले आहे.

3. विवेक जॉन्सन (आयएएस: आरआर: 2018) मुख्य कार्यकारी अधिकारी, झेड.पी., चंद्रपूर यांना बीड येथे नियुक्त करण्यात आले आहे.

4. शुभम गुप्ता (आयएएस: आरआर: 2019) सदस्य सचिव, विदर्भ वैधानिक विकास मंडळ, नागपूर यांना व्यवस्थापकीय संचालक, पश्चिम महाराष्ट्र विकास महामंडळ, पुणे म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

5. पुलकित सिंग (आयएएस: आरआर: 2021) सहाय्यक जिल्हाधिकारी, अंबड उपविभाग, जालना यांना मुख्य कार्यकारी अधिकारी, झेड.पी., चंद्रपूर म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.