
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
वर्ल्डकपपूर्वी हिंदुस्थानने बांगलादेशविरुद्ध लढतीमध्ये चांगलाच सराव केला. दुसऱ्या सराव लढतीत नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या टीम इंडियाने 50 षटकामध्ये 7 विकेट गमावून 359 धावांचा डोंगर उभारला. टीम इंडियाकडून लोकेश राहुल आणि मरेंद्र सिंह धोनी या खेळाडूंनी दणदणीत शतकी खेळी केली. राहुल आणि धोनी फॉर्मात आल्याने टीम इंडियाला वर्ल्डकपपूर्वी दिलासा मिळाला आहे.
बांगलादेशविरुद्ध सलामीवीर शिखर धवन 1 आणि रोहित शर्मा 19 धावांवर बाद झाल्यानंतर चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या राहुलने सुरुवातीपासून बांगलादेशच्या गोलंदाजांसोबत खेळ सुरू केला. प्रथम अर्धशतक आणि नंतर शतक ठोकून राहुलने चौथ्या क्रमांकावर आपणच योग्य असल्याचे दाखवून दिले. राहुलने बाद होण्यापूर्वी 99 चेंडूत 12 चौकार आणि 4 षटकारांसह 108 धावा चोपल्या. तर विराट कोहलीने त्याला उत्तम साथ दिली. अर्धशतकापासून तीन धावा दूर असताना विराट 47 धावांवर बाद झाला.
CENTURY!@klrahul11 brings up a brilliant ton off 94 deliveries.#TeamIndia 255/4 after 42 overs pic.twitter.com/W0kHl7gSjI
— BCCI (@BCCI) May 28, 2019
माही मार रहा है!
राहुल आणि कोहली बाद झाल्यानंतर संपूर्ण सामन्याची सूत्रं धोनीने आपल्या हाती घेतली. धोनीने चौकार आणि षटकारांची आतिषबाजी करत टीम इंडियाची धावसंख्या 300 पार पोहोचलली. यादरम्यान धोनीने आपले अर्धशतक पूर्ण केली. अखेरच्या षटकांमध्ये धोनीने आपल्या जुन्या अंदाजात फलंदाजी करत षटकारांची रीघ लावली. धोनीने बाद होण्यापूर्वी 78 चेंडूत 8 चौकार आणि 7 षटकारांसह 113 धावा चोपल्या. यावेळी धोनीचा स्ट्राईक रेट होता 144.87 एवढा.
Look who’s joined the party
MS Dhoni brings up a quick fire in the warm-up game against Bangladesh pic.twitter.com/dtqPwVNktW
— BCCI (@BCCI) May 28, 2019

























































