पंचांच्या निर्णयाला विरोध गिलच्या अंगलट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानचा युवा सलामीवीर शुभमन गिल याला पंचांच्या निर्णायाविरुद्ध सोशल मीडियावर विरोध करणं चांगलंच अंगलट आलं. ‘आयसीसी’च्या आचारसंहितेचं उल्लंघन केल्यामुळे त्याच्यावर सामना मानधनातील 15 टक्के रक्कमेचा दंड ठोठावण्यात आला आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या जागतिक कसोटी क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम लढतीत शुभमन गिल दुसऱया डावात स्कॉट बोलँडच्या गोलंदाजीवर स्लीपमध्ये झेलबाद झाला. मात्र शुभमन गिलचा पॅमरून ग्रीनने घेतलेला हा झेल वादाच्या भोवऱयात अडकला. निर्णय तिसऱया पंचांकडे गेला होता. तिसऱया पंचांनी ग्रीनने टिपलेल्या या झेलच्या बाजूने मत देत गिलला बाद ठरविले. मात्र ग्रीनने त्याचा घेतलेला झेल वादग्रस्त ठरला. यानंतर गिलने सोशल मीडियावर एक पोस्ट केली होती. यात तिसऱया पंचाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं गेलं. या वेळी गिलने ग्रीन झेल पकडताना चेंडू खाली जमिनीला टेकल्याचा पह्टो ट्विट केला. आयसीसीच्या कोड ऑफ पंडक्ट नियम क्रमांक 2.7 नुसार खेळाडू किंवा सपोर्ट् स्टाफची सोशल मीडिया पोस्ट ही आयसीसी कोड ऑफ पंडक्टच्या उल्लंघनाच्या कक्षेत येते. त्यामुळे गिलवर आयसीसीने दंडात्मक कारवाई केली.