
युवराज सिंगचा चेला आणि त्याच्यासारखी बेधडक फलंदाजीसाठी ओळखला जाणारा टीम इंडियाचा स्टार विस्फोटक फलंदाज अभिषेक शर्माला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. पोटदुखीमुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, आता त्याला रुग्णालयातून सोडण्यात आल्याची माहिती तिलक वर्माने पत्रकार परिषदेमध्ये दिली. अभिषेकच्या डिस्चार्जमुळे हिंदुस्थानी चाहत्यांसह टीम इंडियाच्या गोटात आनंदाचे वातावरण आहे.
टीम इंडियाचा पहिला सामना अमेरिकेविरुद्ध खेळला गेला. या सामन्यात टीम इंडियाने निर्विवाद वर्चस्व गाजवत अमेरिकेला पराभवाची धुळ चारली. सामन्या दरम्यान अभिषेक शर्माची तब्येत बिघडली. मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरच्या घरी टीम इंडियाच्या खेळाडूंसह तो डिनर पार्टीसाठी गेला होता. मात्र, पोटात दुखत असल्यामुळे मी लवकर परतला आणि नंतर दिल्ली येथील रुग्णालयात त्याला दाखल करण्यात आले. यामुळे चाहत्यांची धाकधुक वाढली होती. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात अभिषेक मैदानात उतरणार का? यावर मोठं प्रश्चचिन्ह निर्माण झालं होतं. मात्र, आता त्याला डिस्चार्च मिळल्याने अभिषेक पाकिस्तानला चोपून काढण्यासाठी सज्ज होईल, अशी चाहत्यांना अपेक्षा आहे.
टीम इंडियाचा पुढचा सामना आता 12 फेब्रुवारी रोजी नामिबियाविरुद्ध दिल्ली अरुण जेटली स्टेडियमवर खेळला जाणार आहे. तर 15 फेब्रुवारी रोजी पाकिस्तानविरुद्ध श्रीलंकेतील कोलंबोमध्ये सामना खेळला जाणार आहे.


























































