अमरनाथ गुहेतील बर्फाचे शिवलिंग वितळले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

3 जुलैपासून सुरू झालेल्या अमरनाथ यात्रेला अवघे पाच दिवस झाले असून अमरनाथ गुहेतील नैसर्गिक बर्फाचे शिवलिंग पूर्णपणे वितळले आहे. ही यात्रा 57 दिवस चालणार आहे. यात्रेच्या चार दिवसांत आतापर्यंत 86 हजार भाविकांनी या पवित्र गुहेचे दर्शन घेतले आहे. यात्रेसाठी 4 लाख भाविकांनी नोंदणी केली असून अजून 3 लाखांहून अधिक भाविकांना दर्शन घ्यायचे आहे. 23 मे रोजी शिवलिंगाचा आकार 7 फूट होता. 6 जुलैला हिमलिंग 90 टक्के वितळल्याचे दिसले आहे.