
महापालिका व न्यायालयाने बंदी घालूनही कबुतरखाना सुरू ठेवण्यासाठी आंदोलन करणाऱ्या जैन समाजाला व पक्षीप्रेमींना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सुनावले आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. ‘कबुतरांमुळे रोगराई पसरते एवढेही भान हे लोक बाळगत नाहीत. खरंतर त्यांना सर्व माहीत आहे, पण राजकारण करायचे आहे. मुंबईत गुजराती, मारवाडी 13 टक्के आहेत. त्यांना पैशाचा एवढाच माज असेल तर कबुतरे गुजरातला जाऊन उडवावीत,’ असे राज ठाकरे म्हणाले.




























































