हिवाळ्यात फिट राहायचे असेल तर… हे करून पहा

जानेवारी महिन्यात थंडी वाढते. वात आणि कफ या दोषांचे संतुलन बिघडले की सर्दी, खोकला आणि सांधेदुखी यासारखे आजार वाढतात. यावर आयुष मंत्रालयाने काही सोपे उपाय दिले आहेत.

नैसर्गिकरीत्या आपली प्रतिकारशक्ती वाढविण्यावर भर दिला पाहिजे. हिवाळ्यात गोड, आंबट आणि खारट या तीन चवींचा समावेश आवर्जून करावा.

आहारात दूध, दही आणि तुपाचा समावेश असावा. तुपामुळे सांधेदुखीचा त्रास कमी होतो. तसेच दुग्धजन्य पदार्थांमुळे प्रथिने आणि कॅल्शियम भरपूर मिळतात. रात्री झोपण्यापूर्वी कोमट दूध आवर्जून प्यावे.

मोहरी किंवा तिळाच्या तेलाने मालिश केल्यास रक्ताभिसरण सुधारते.