मुंबई परिसरातील अनधिकृत बांधकामे थांबायलाच हवीत! कामात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांवरही कारवाई करा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई तसेच आसपासच्या महापालिका हद्दीत बेकायदा बांधकामे कोसळून होणाऱ्या दुर्घटनांमध्ये निष्पाप लोकांचा बळी जातो. त्यामुळे कुठे ना कुठे तरी हे थांबायलाच हवे असे स्पष्ट करत बेकायदा बांधकामांना वेळीच आळा घालण्यात यावा तसेच अनधिकृत बांधकामांकडे कानाडोळा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर खटले भरून कारवाई करावी असे आदेश अनधिकृत बांधकामासंदर्भातील सुमोटो याचिकेवरील निकाल जाहीर करताना मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाने आज दिले.

न्यायालयाने काय म्हटलंय?

  • राज्यघटनेच्या अनुच्छेद 21 नुसार ज्याप्रमाणे नागरिकांना जगण्याचा अधिकार आहे त्याचप्रमाणे सुरक्षित घरात राहण्याचा हक्क आहे. जिलानीसारख्या दुर्घटना टाळण्यासाठी अधिकाऱ्यांनी वेळीच इमारतींचे ऑडिट करायला हवे.
  • अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याचा महापालिकेला पूर्ण अधिकार.
  • अधिकाऱ्यांच्या कर्तव्यातील निष्काळजीपणामुळेच निष्पाप नागरिकांचा जीव जातो.
  • महापालिकेतील अधिकारी आणि भूमाफियांमध्ये होणारे भ्रष्ट व्यवहार रोखायला हवेत.
  • दर्जेदार साहित्य न वापरल्याने इमारती कोसळतात. त्यामुळे इमारत बांधकामात वापरल्या जाणाऱ्या साहित्याचा दर्जा राखला गेला पाहिजे.