लता मंगेशकर यांच्या प्रकृतीत सुधारणा, कुटुंबीयांनी मानले चाहत्यांचे आभार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण झाल्याने मुंबईच्या ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वय जास्त असल्यामुळे त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. मात्र त्यांच्या प्रकृतीत आता सुधारणा झाल्याची माहिती मंगेशकर कुटुंबीयांनी गुरुवारी दिली.

ब्रीच कॅण्डी रुग्णालयातील डॉक्टरांची टीम आणि मंगेशकर कुटुंबीयांच्या वतीने लतादीदींचे हेल्थ अपडेट आज देण्यात आले. तसेच लतादीदींसाठी प्रार्थना करणाऱया चाहत्यांचे आभार मानण्यात आले. ‘लतादीदी ब्रीच कॅण्डी रुग्णालयाच्या आयसीयू विभागात उपचार घेत असून त्यांच्यावर अजून उपचार सुरू आहेत. आज सकाळी त्यांची एक्सटय़ूबेशनची म्हणजेच काही वेळासाठी व्हेंटिलेटर बंद करून प्रतिसादाची चाचणी करण्यात आली. या चाचणीत त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. मात्र तरीही त्यांना काही दिवस डॉक्टर प्रतीत समदानी आणि त्यांच्या संपूर्ण टीमच्या निगराणीखाली ठेवण्यात येणार आहे. तुम्हा सर्वांच्या प्रार्थनेसाठी आम्ही आभारी आहोत, असे मंगेशकर कुटुंबीयांनी म्हटले आहे.