
आंतर को-ऑपरेटिव्ह बँक एकेरी कॅरम स्पर्धेत पुरुष गटामध्ये सोहेल मुकादमने व महिला गटात संध्या बापेरकरने तर बुद्धिबळ स्पर्धेत सचिन काटकरने विजेतेपद पटकाविले. कोंकण मर्कंटाईल को-ऑप. बँकेच्या सोहेल मुकादमने सिटी को-ऑप. बँकेच्या शिशिर खडपेचे आव्हान 18-2, 19-10 असे सहज संपुष्टात आणून विजेतेपदाला गवसणी घातली.
कॅरम स्पर्धेत महिला एकेरीच्या अंतिम फेरीत म्युनिसिपल बँकेची संध्या बापेरकरने उषा कांबळेचा 8-9, 15-0, 19-11 असा पराभव करीत अजिंक्यपदावर शिक्कामोर्तब केले. दुहेरी गटाचे विजेतेपद पटकाविताना महिलांमध्ये म्युनिसिपल बँकेच्या मानसी पाटील-संगीता बेंबडे जोडीने त्यांच्याच बँकेच्या संध्या बापेरकर-शर्वरी सावंत जोडीचा 17-1, 10-4 असा पराभव केला. पुरुषांमध्ये सोहेल मुकादम-वसिम खान जोडीने भार्गव धारगळकर – दीपक गायकवाड जोडीचा 25-0, 18-0 असा पराभव करून बाजी मारली.





























































