बोलेरो झाडावर आदळून चालकासह 14 महिला जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 चालकाचे नियंत्रण सुटून बोलेरो जीप झाडावर आदळल्याची घटना चंदगड तालुक्यातील कलिवडे येथे घडली. यात वाहनचालकासह 14 महिला जखमी झाल्या आहेत.

 चालक महेश मारुती डुरे (वय 29, रा. मजरे कारवे, ता. चंदगड), जयश्री दत्तू कांबळे (वय 40), ठकूताई जानू कोकरे (वय 18), छाया संजय मोरे (वय 32), बमाबाई लक्ष्मण लांबोर (वय 54), आरती सीताराम गावडे (वय 20), सुमित्रा दशरथ कांबळे (वय 45), अनिता शंकर कांबळे (वय 46), नीलम अमृत कांबळे (वय 28), मनाली महेश कांबळे (वय 30), शोभा संभाजी कांबळे (वय 39), गीता गणू कांबळे (वय 42), शालन संभाजी गुरव (वय 48), पूनम दत्तू कांबळे (वय 21, सर्व रा. कलिवडे, ता. चंदगड) अशी जखमींची नावे आहेत.

 जंकमहट्टी फाटय़ावर असलेल्या काजू कारखानातून काम संपल्यावर महिला कामगारांना संध्याकाळी गावी घरी पोहचविण्यासाठी चालक महेश डुरे हा बोलेरो गाडी घेऊन कलिवडे गावाला जाण्यासाठी निघाला होता. कलिवडे फाटय़ाजवळ चालक डुरे याचा वाहनावरील ताबा सुटल्याने जीप रस्त्याकडेला असणाऱया झाडावर आदळली. यामध्ये वाहनचालकासह महिला गंभीर जखमी झाल्या आहे. या अपघाताची माहिती समजताच, अनेकांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमी महिलांना बेळगाव येथील रुग्णालयात दाखल केले. चंदगड पोलिसांत या अपघाताची नोंद करण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते.