
झारखंडच्या लातेहार गावात अनोखी परंपरा आहे. लातेहार गावात माणसांप्रमाणे जनावरांना एक दिवसाची साप्ताहिक सुट्टी दिली जाते. गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, 100 वर्षांपासूनची ही परंपरा आहे. त्याकाळी गावात एका बैलाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर गावकऱ्यांनी आठवडय़ातून एकदा जनावरांना विश्रांती देण्याचा नियम बनवला. तो आजतागायत कायम आहे. ज्याप्रमाणे माणसाला विश्रांतीसाठी एक दिवस निश्चित असतो, त्याचप्रमाणे जनावरांनाही विश्रांतीची गरज असते, असे गावकऱयांचे म्हणणे आहे.

























































