
उत्तर प्रदेशातील लखनऊमधील पारा पोलीस स्टेशन परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीची निर्घृण हत्या करण्यात आली. 13 जानेवारी रोजी घरातून बेपत्ता झालेल्या मुलीला तिच्या मित्राने तिला भेटण्यासाठी फोन केला होता. मृत अल्पवयीन मुलगी कुटुंबाला नैनितालला चालली असे सांगून त्याला भेटण्यासाठी घराबाहेर पडली. बराच वेळ घरी आली नाही म्हणून कुटुंबियांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
पोलिस तपासात असे दिसून आले की मृत अल्पवयीन मुलगी आणि आरोपी अंशू गौतम यांचे एकमेकांवर प्रेम होते. परंतु नंतर आरोपी अंशू गौतम याला संशय आला की ती त्याचा मित्र आशिक यादवशीही ती संपर्कात आहे. हा दोघांच्या मैत्रितला अडथळा मानून दोन्ही मित्रांनी मुलीला संपवण्याचा कट रचला. 13 जानेवारी रोजी संध्याकाळी त्यांनी तिला फोनवरून बोलावले, तिला जबरदस्तीने टाटा सफारीमध्ये बसवले आणि अमानूष मारहाण केली आणि गळा दाबून तिला मारण्यात आले.
हत्येनंतर, पुरावे लपवण्यासाठी आरोपींनी तिचा मृतदेह सरोजिनी नगर परिसरातील रेल्वे रुळावर अशाप्रकारे ठेवला जेणेकरून ती आत्महत्या असल्याचे भासेल. मुलीला ट्रेनने धडक दिल्याने तिचे डोके तिच्या शरीरापासून वेगळे झाले. आरोपींनी ओळख लपवण्यासाठी स्वतःचे आणि मुलीचा मोबाईल फोन तोडले आणि फेकून दिले. पोलिसांनी तपासा दरम्यान मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे आरोपी अंशु गौतम आणि त्याचे तीन मित्र आशिक यादव, ऋषू यादव आणि वैभव सिंग राजपूत यांना 26 जानेवारी रोजी अटक केरण्यात आली.
मुलीच्या आईचा आरोप आहे की, तिने 14 जानेवारी रोजी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. परंतु मुलगी सापडेल असे पोलीस सांगत राहिले. चारही आरोपींना अटक करण्यात आली तेव्हा कुटुंबातील सदस्यांनी पोलीस ठाण्यात जाऊन निषेध केला आणि फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली. एसएचओ सुरेश सिंह यांच्या म्हणण्यनुसार या प्रकरणाची निष्पक्षपणे चौकशी केली जात आहे. आणि सर्व दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे सांगण्यात आले आहे.
























































