एका महिन्यात अवैधरित्या दारू वाहतुकीचे 26 गुन्हे दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सध्या कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अऩेक निर्बंध आहेत. असे असूनही अवैधरित्या दारू वाहतूक व विक्री केली जात आहे. अशा तक्रारींची दखल घेऊन राज्य उत्पादन शुल्काच्या अधिकाऱ्यांनी विशेष मोहीम राबवून एका महिन्यात 26 गुन्हे दाखल केले आहेत. तर 28 आरोपींना अटक केले आहे. 5 लाख 83 हजार 544 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये 308 बॅरल देशी दारू, 154 लिटर ताडी, 9 दुचाकी मोटरसायकल, एक रिक्षा जप्त केली आहे.

राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूर विभागाचे उपायुक्त वाय. एम. पवार यांच्या मार्गदर्शनाखाली, सातारचे अधीक्षक अनिल चासकर यांच्या सूचनेनुसार कराड कार्यालयाचे निरीक्षक आर. एस. पाटील, दुय्यम निरीक्षक एस. बी. जंगम, आर. एस. खंडागळे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक एस. टी. बावकर, विनोद बनसोडे, एस. आर. बाक्केवाढ, जे. एस. माने, डी. एस. माळी या पथकाने मोहीम यशस्वी केली आहे.

अवैधरित्या आणि चोरटी वाहतूक करून बेकायदेशीर दारू विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती कराड कार्यालयाचे निरीक्षक आर. एस. पाटील यांनी दिली आहे.