शाहूवाडी येथे बिबटय़ाच्या हल्ल्यात चिमुकलीचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बिबटय़ाने केलेल्या हल्ल्यात जनावरे चारण्यासाठी गेलेल्या चिमुकलीचा मृत्यू झाल्याची घटना शाहूवाडी तालुक्यातील उदगिरीपैकी केदारलिंगवाडी परिसरात घडली आहे. या घटनेत मुलीची आई बचावली आहे. परिसरात प्रथमच असा प्रकार घडल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आणखी बळी जाण्यापूर्वीच त्या बिबटय़ाचा वनविभागाने बंदोबस्त करावा, अशी मागणी होऊ लागली आहे.

मनीषा बाबाजी डोईफोडे (वय 10, सध्या रा. केदारलिंगवाडी, मूळ रा. पुसाळे, ता. शाहूवाडी) असे मृत मुलीचे नाव आहे.

शाहूवाडी तालुक्यातील पुसाळे येथील बाबाजी डोईफोडे हे गेल्या चार महिन्यांपासून कुटुंबासह उदगिरीपैकी केदारलिंगवाडी येथे राहत आहेत. त्यांची पत्नी आणि मुलगी आज सकाळी साडेआठच्या सुमारास जनावरांना चारण्यासाठी घेऊन गेले होते. केदारलिंग वाडीपासून एक किलोमीटर अंतरावर जनावरांच्या मागे असलेल्या मनीषाला बिबटय़ाने झडप मारून पकडले. काही अंतर पुढे गेल्यावर मुलीचा आवाज येत नसल्याने, आईने मुलीचा शोध सुरू केल्यानंतर काही अंतरावर गवतात मुलीला ओढून नेणारा बिबटय़ा दिसला. मुलीच्या आईने आरडाओरडा करताच बिबटय़ाने मनीषाला टाकून जंगलात पळ काढला.

आईने आरडाओरडा केल्याने गाककऱयांनी लगेच घटनास्थळी धाक घेतली. मात्र, बिबटय़ाने मुलीची मान पकडल्याने तिचा जागीच मृत्यू झाला होता. या गाकापासून चांदोली अभयारण्य काही अंतराकर आहे. यामुळे या भागात बिबटय़ांचा काकर काढला आहे. यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे काताकरण पसरले आहे. आता बिबटय़ाला पकडण्याची मागणी ग्रामस्थ करीत आहेत.