देवगड-जामसंडे येथे अग्निशामक सेवेचा शुभारंभ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देवगड-जामसंडे नगरपंचायत अग्निशामक सेवा वाहन देवगडमध्ये दाखल झाले असून या अग्निशामक सेवेचा शुभारंभ आणि लोकार्पण सोहळा नगराध्यक्षा साक्षी प्रभू यांच्या हस्ते ग्रामदेवता श्री दिर्बादेवी मातेचे आशीर्वाद घेऊन श्रीफळ फोडून करण्यात आले.

यावेळी बांधकाम सभापती गटनेते संतोष तारी आरोग्य सभापती विशाल मांजरेकर, नगरसेवक नितीन बांदेकर, तेजस मामघाडी निवृत्ती तारी, सुधीर तांबे, काँग्रेस अध्यक्ष उमेश कुळकर्णी, युवसेना उपजिल्हाप्रमुख निनाद देशपांडे, स्वप्नाली वाल्मिकी, योगेश गोळम, बाळा कणेरकर, संदेश पाटकर, विजय पाटील, कर्मचारी मनीष मोंडकर, घनश्याम धुरी उपस्थित होते.

या अग्निशमन सेवा वाहनाचे जामसंडे व्यापारी वर्गातर्फे पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले. यावेळी जामसंडे व्यापारी संघ अध्यक्ष राजू पाटील, अनिल रानडे, सुरेश कावले, रुपेश नवलू, रविंद्र ठुकरुल, सौरभ काटदरे उपस्थित होते. देवगड शहर ग्रामस्थ मंडळाचे वतीने देवगड मांजरेकर नाका येथे श्रीफळ वाढवून पुष्पहार अर्पण करून वाहनाचे स्वागत करण्यात आले. यावेळी देवगड जामसंडे शहरातून अग्निशमन वाहन फिरवून अग्निशमन सेवा कार्यरत झाल्याचे सूचित करण्यात आले.