लोकसभेचा निकाल उशिराने लागणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
2013 साली व्हीव्हीपॅट यंत्रणा देशात पहिल्यांदा राबवली गेली. नागालँडमधल्या निवडणुकांमध्ये व्हीव्हीपॅटचा वापर करण्यात आला.

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा तीन दिवसांवर आला असतानाच सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला महत्त्वपूर्ण आदेश दिले आहेत. प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील कोणत्याही पाच मतदान केंद्रांवरील ‘व्हीव्हीपॅट’ पावत्यांची मोजणी करावी अशी सूचना न्यायालयाने केली आहे. त्यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीचे निकाल उशिराने लागण्याची शक्यता आहे.