केएल राहुल आणि साई सुदर्शनने गेम केला! कांगारुंचा धुव्वा उडवत इंडिया A च्या पठ्ठ्यांनी इतिहास रचला

Photo - BCCI

हिंदुस्थान ‘अ’ आणि ऑस्ट्रेलिया ‘अ’ यांच्यामध्ये दोन सामन्यांची अनधिकृती कसोटी मालिका पार पडली. या मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्यात हिंदुस्थान ‘अ’ संघाने बाजी मारत 412 धावांच खडतर आव्हान पाच गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण करत सामन्यासह मालिकेवर कब्जा केला. केएल राहुल आणि साई सुदर्शनने संयमी फलंदाजी करत संघाच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. त्यांच्या या दमदार खेळीमुळे ध्रुव जुरेलच्या नेतृत्वात हिंदुस्थान ‘अ’ संघाने इतिहास रचला आहे.

ऑस्ट्रेलियाने हिंदुस्थानला जिंकण्यासाठी 412 धावांचं आव्हान दिलं होतं. यापूर्वीचा ‘अ’ संघांचा इतिहास पाहता मागील 43 वर्षात कोणत्याच संघाला 400 हून अधिक धावांच्या आव्हानाचा पाठलाग करता आलेला नाही. त्यामुळे हिंदुस्थानचा दुसरा डाव सुरू झाला तेव्हा ऑस्ट्रेलियाच पारडं जड मानलं जात होतं. परंतु सलामीला आलेल्या केएल राहुलने ऑस्ट्रेलियाला स्वप्नांना मातीत गाडलं आणि 210 चेंडूंचा सामना करत 16 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने नाबाद 176 धावांची खेळी केली. एन जगदीशन (36) स्वस्तात माघारी परतला. मात्र, तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या साई सुदर्शनने एन जगदीशनच्या विकेटचा आनंद ऑस्ट्रेलियाला घेऊ दिला नाही. त्याने 172 चेंडूंचा सामना करत 100 धावा चोपून काढल्या. त्यानंतर कर्णधार ध्रुव जुरेल (56) आणि नितीश कुमार रेड्डी (नाबाद 16) यांनी केलेल्या महत्त्वपूर्ण धावांमुळे संघाने पाच गडांच्या मोबदल्यात 413 धावा करत सामना जिंकला आणि इतिहासात सूवर्णअक्षरांनी हिंदुस्थान ‘अ’ नावं नोदलं गेलं.

Asia cup 2025 – 41 वर्षानंतर फायनलमध्ये भीडणार हिंदुस्थान-पाकिस्तान, सूर्याची सेना सज्ज

हिंदुस्थानचा ‘अ’ संघ आता 400 हून अधिक धावांच्या आव्हानाचा पाठलाग करणारा एकमेव संघ ठरला आहे. याबाबतीत दुसऱ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलिया ‘अ’ संघ असून त्यांनी श्रीलंकेविरुद्ध 2022 साली 367 धावांच्या आव्हानाचा पाठलाग केला होता. तर तिसऱ्या क्रमांकावर वेस्ट इंडिज ‘अ’ संघ असून त्यांनी इंग्लंड ‘अ’ संघाविरुद्ध 2006 साली 365 धावांच्या आव्हानाचा पाठलाग केला होता.