… तर काही वर्षापूर्वीच सलामीला आलो असतो, ‘हिटमॅन’ रोहितचा गौप्यस्फोट

4608

विशाखापट्टणम येथे रंगलेली पहिली कसोटी टीम इंडियाने 203 धावांनी जिंकली. विजयासाठी दिलेल्या 395 धावांचा पाठलाग करताना आफ्रिकेचा संघ मोहम्मद शमी आणि रविंद्र जाडेजा यांच्या गोलंदाजीसमोर हतबल दिसला. शमीच्या पाच विकेट्स आणि जाडेजाच्या चार विकेट्सच्या बळावर हिंदुस्थानने आफ्रिकेला 191 धावांमध्ये गुंडाळले. या विजयासह टीम इंडियाने कसोटी चॅम्पियनशीपमध्येहीआपला दबदबा कायम राखला आहे.

सलामीचा फलंदाज म्हणून पहिलाच सामना खेळणाऱ्या रोहित शर्माने पहिल्या डावात 176 धावांची तर दुसऱ्या डावात 127 धावांची तुफानी खेळी केली. रोहित शर्माने आपल्या दोन डावांमध्ये 13 षटकार लगावले आहेत. कसोटी सामन्यात एकाच लढतीमध्ये एवढे षटकार लगावणारा रोहित पहिला फलंदाज आहे. या सामन्यात रोहित शर्माने 303 (पहिल्या डावात 176 आणि दुसऱ्या डावात 127) धावा करत ‘सामनावीर’चा पुरस्कार पटकावला.

शमीचा ‘पंच’, जाडेजाचा ‘चौकार’, आफ्रिकेचा 203 धावांनी दारूण पराभव

रोहितने सामनावीराचा पुरस्कार मिळवत एक गौप्यस्पोट केला. मला फक्त फलंदाजीमध्ये चांगली कामगिरी करायची होती. सलामीच्या संधीमुळे मी आनंदी आहे. सामना जिंकण्यासाठी सांघिक खेळ महत्त्वाचा होता. आम्ही सुध्दा तेच केले, त्यामुळं हे यश मिळाले, असे रोहित म्हणाला. तसेच काही वर्षांपूर्वी मला सलामीला फलंदाजी करायला मिळेल असे ऐकले होते. त्यामुळे मी नेटमध्येही नवीन चेंडूने सराव करायचो. त्यामुळे आजच्या सामन्यात फलंदाजी करताना चिंता नव्हती, असेही तो म्हणाला.

एका कसोटीत दोन शतके अन् 13 षटकार, रोहितचा विक्रमी धमाका!

पुढे बोलताना रोहित म्हणाला की, माझे ध्येय खेळाची मजा घेत खेळणे असते. संघाला मजबूत स्थितीत पोहचवणे हे माझे काम असते. काही शॉट खेळण्याची गरज होती, ते मी केले. मला रेकॉर्ड्स नाही माहीत, मी फक्त खेळण्यावर लक्ष देतो.

आपली प्रतिक्रिया द्या