निर्णायक लढतीसाठी ‘टीम इंडिया’चा सराव सुरू, हिंदुस्थान-ऑस्ट्रेलिया चौथी कसोटी उद्यापासून 

हिंदुस्थान-ऑस्ट्रेलिया दरम्यानचा चौथा आणि अखेरचा कसोटी क्रिकेट सामना शुक्रवारपासून सुरू होणार आहे. अनेक खेळाडू जायबंदी झाल्यानंतरही हिंदुस्थानने जिवाचे रान करून सिडनी कसोटी वाचविली. ‘मोडून पडला संघ, पण मोडला नाही कणा’ असा लढवय्या बाणा अजिंक्य रहाणेच्या शिलेदारांनी कांगारूंना दाखवून दिला. आता निर्णायक आणि चौथ्या कसोटीच्या मोर्चेबांधणीसाठी हिंदुस्थानी खेळाडूंनी सरावाला सुरुवात केली. मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्र्ााr आणि अनुभवी खेळाडू या नात्याने उपकर्णधार रोहित शर्माने आजच्या सरावादरम्यान संघसहकाऱयांना प्रेरित करण्याचा प्रयत्न केला.

ब्रिस्बेन कांगारूंसाठी लकी मैदान

ब्रिस्बेन हे मैदान ऑस्ट्रेलियासाठी आतापर्यंत सर्वांत लकी ठरलेले आहे. कारण गेल्या 33 वर्षांमध्ये ऑस्ट्रेलियाच्या संघाने या मैदानावर पराभव बघितलेला नाही. यापूर्वी 1988 साली वेस्ट इंडीजने या मैदानात कांगारूंना धूळ चारली होती. त्यानंतर झालेल्या 31 सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाने या मैदानात एकही सामना गमावलेला नाही. त्यामुळे हिंदुस्थानी गोटात नक्कीच चिंतेचे वातावरण असेल. मात्र नव्या दमाचे हिंदुस्थानी गोलंदाज मिळालेल्या संधीचे सोने करण्यासाठी उत्सुक असल्याने ऑस्ट्रेलियासाठी अखेरची कसोटी नक्कीच सोपी नसेल एवढे नक्की.

पहिल्यांदाच असा बाका प्रसंग

एकाच मालिकेदरम्यान आठ-नऊ खेळाडूंना दुखापत होण्याची ही कदाचित पहिलीच वेळ असेल. असा बाका प्रसंग ओढावल्याने संघाची जमलेली घडी विस्कटून गेली. त्यामुळे ब्रिस्बेन कसोटीपूर्वी प्रशिक्षक या नात्याने रवी शास्त्र्ााr आणि कर्णधार अजिंक्य रहाणे व उपकर्णधार रोहित शर्मा यांची खरी कसोटी लागणार आहे.  शास्त्र्ााr यांनी सर्व संघांतील खेळाडूंना सध्याच्या प्रतिकूल परिस्थितीवर कशी मात करायची याबाबत धडे दिले. अनुभवी खेळाडू या नात्याने रोहितनेही आपले अनुभव अन्य खेळाडूंबरोबर शेअर केले. हिंदुस्थानी संघापुढे बऱयाच अडचणी आहेत, पण या अडचणींवर कशी मात करायची हे रोहितने सहकाऱयांना समजावून सांगितले. सरावादरम्यान शार्दुल ठाकूरसोबत जसप्रीत बुमराहदेखील होता.  फलंदाजीमध्ये रोहित, अजिंक्य, चेतेश्वर पुजारा, रिद्धीमान साहा असे अनुभवी खेळाडू आहेत, मात्र गोलंदाजीची धुरा नव्या दमाच्या शिलेदारांच्या खांद्यावर आहे.

आपली प्रतिक्रिया द्या