आव्हानाचा सामना करणाऱ्या नव्या हिंदुस्थानचा मी कर्णधार, कोहलीचे ग्रेग चॅपल यांना ‘जशास-तसे’ उत्तर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थान आणि ऑस्ट्रेलिया संघात उद्या (17 डिसेंबर) पासून चार कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होणार आहे. ऍडलेडमध्ये पहिला डे-नाईट कसोटी सामना रंगणार आहे. मात्र तत्पूर्वीच दोन्ही संघाचा शाब्दिक सामना रंगू लागला आहे.

ऑस्ट्रेलियाचे माजी खेळाडू आणि कर्णधार ग्रेग चॅपल यांनीही यात उडी घेतली आणि विराट कोहलीला डिवचले. गैर ऑस्ट्रेलिया खेळाडूंमध्ये विराट कोहली याची मानसिकता ऑस्ट्रेलियन खेळाडूंसारखी आहे, असे चॅपल म्हणाले होते. याला आता विराट कोहली याने उत्तर दिले आहे.

कसोटी मालिकेला सुरुवात होण्यापूर्वी विराट कोहली याने आपली प्रतिक्रिया दिली. आव्हानाचा सामना करणाऱ्या नव्या हिंदुस्थानचा मी कर्णधार आहे, असे विराट कोहली म्हणाला.

चॅपल यांनी केलेल्या विधानाबाबत विराटला प्रश्न विचारण्यात आला तेव्हा तो म्हणाला, मी नेहमीच बोलतो की ही माझी खास शैली आहे. मी नव्या हिंदुस्थानचे प्रतिनिधित्व करतो, जो नव्या आव्हानाचा सामना करण्यास नेहमी तयार असतो. आव्हानाचा सामना करण्यास न घाबरता सज्ज असणे असा नव्या हिंदुस्थानचा अर्थ आहे, असेही विराट म्हणाला.

https://twitter.com/BCCI/status/1339121199238901761?s=19

दरम्यान, पहिला कसोटी सामना खेळून विराट कोहली मायदेशी परतणार आहे. जानेवारीत विराट कोहली बाबा होणार असून यामुळे त्याने पितृत्वाची रजा घेतली आहे.