IND Vs ENG 5th Test – टीम इंडियाचा दुसरा डाव संपुष्टात, इंग्लंडला जिंकण्यासाठी 374 धावांच आव्हान

अ‍ॅण्डरसन-तेंडुलकर मालिकेतील शेवटची कसोटी लंडनच्या ओव्हल मैदानावर खेळली जात आहे. सामन्याच्या तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरू असून टीम इंडियाचा दुसरा डाव 396 धावांवर संपुष्टात आला. इंग्लंडने आपल्या दुसऱ्या डावाला सुरुवात केली असून इंग्लंडला जिंकण्यासाठी 374 धावांच आव्हान टीम इंडियाने दिलं आहे.

टीम इंडियाने आपल्या पहिल्या डावात सर्वगडी बाद 396 धावांपर्यंत मजल मारली. यशस्वी जयस्वाल (118), आकाश दीप (66), रविंद्र जडेजा (53), ध्रुव जुरेल (34) आणि वॉशिंग्टन सुंदर (53) यांनी केलेल्या धमाकेदार फलंदाजीमुळे इंग्लंडला 374 धावांच आव्हान देण्यात टीम इंडियाला यश आलं आहे. दरम्यान, टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात 224 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात आक्रमक सुरूवात करूनही इंग्लंडची गाडी पहिल्या डावात 247 धावांपर्यंतच पोहोचू शकली. त्यानंतर टीम इंडियाने आपला दुसरा डावात पहिल्या डावाची कसर भरून काढत दमदार फलंदाजी केली आणि इंग्लंडला जिंकण्यासाठी 347 धावांच आव्हान दिलं. सध्या इंग्लंडने 9 षटकांच्या समाप्तीनंतर बिनबाद 39 धावा केल्या आहेत. झॅक क्रॉली (13*) आणि बेन डकेट (23*) फलंदाजी करत आहेत.