
सामना ऑनलाईन । नॉटिंघम
हिंदुस्थान आणि इंग्लंड संघात सुरू असलेल्या तीन एक दिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात हिंदुस्थानने इंग्लंडचा ८ विकेट्सने दणदणीत पराभव करत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. सलामीवीर रोहित शर्माच्या नाबाद १३७ धावा आणि विराट कोहलीच्या अर्धशतकीय खेळीच्या जोरावर हिंदुस्थानने हा विजय मिळवला.
यापूर्वी प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने हिंदुस्थानसमोर २६९ धावांचे आव्हान ठेवले होते. चायनामॅन गोलंदाज कुलदीप यादवच्या फिरकीच्या जाळ्यात अडकलेला इंग्लंडचा संघ पूर्ण ५० षटकंही खेळू शकला नाही. इंग्लंडचा संघ ४९.५ षटकात २६८ धावा काढून बाद झाला. फिरकी गोलंदाज कुलदीप यादवने बळींचा षटकार लगावला.
Innings Break!
And that’s that from the England innings, they are all out for 268 with one ball to spare.#TeamIndia need 269 runs to win the 1st ODI.
Follow the game here – https://t.co/iWWklQz7H3 #ENGvIND pic.twitter.com/gDj1C0JAjA
— BCCI (@BCCI) July 12, 2018
कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेत यजमान इंग्लंडला फलंदाजीसाठी आमंत्रीत केले. सलामीवर जेसन रॉय आणि जॉनी बेअरस्टोने इंग्लंडला १० षटकात ७३ धावांची मजबूत सलामी दिली. दोन्ही सलामीवीर वेगवान गोलंदाजांच्या चिंधड्या उडवत असल्याने विराटने चेंडू फिरकी गोलंदाज कुलदीप यादवच्या हाती सोपवला. कुलदीपनेही कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवत एकामागोमाग एक दोन्ही सलामीविरांना बाद केले. रॉय आणि बेअरस्टो या दोघांनीही ३५ चेंडूचा सामना करताना प्रत्येकी ३८ धावा केल्या.
दोन सलामीविरांना बाद केल्यानंतरही कुलदीपची यादवगिरी थांबली नाही. त्यानंतर आलेल्या जो रूटलाही यादवने फक्त ३ धावांवर माघारी धाडले. त्यानंतर चहलने कर्णधार मॉर्गनला १९ धावांवर बाद करत इंग्लंडची अवस्था ४ बाद १०५ अशी केली. चार गडी झटपट बाद झाल्यानंतर संकटात सापडेला इंग्लंडचा डाव बेन स्टोक्स आणि जोस बटलरने सावरला दोघांमध्ये ९३ धावांची भागिदारी झाली. या दरम्यान दोघांनीही अर्धशतक साजरे केले. अर्धशतकानंतर कुलदीपने दोघांनाही बाद केले. स्टोक्सने ५० आणि बटलरने ५३ धावा केल्या. त्यानंतर उमेश यादवने अखेरचे बळी टिपत इंग्लंडला ऑल आऊट केले. उमेश यादवने २, तर युझवेंद्र चहलने १ बळी घेतला.































































