
लीड्सच्या हेडिंग्ले मैदानावर हिंदुस्थान आणि इंग्लंड संघात तिसरा कसोटी सामना सुरू आहे. हिंदुस्थानने पहिल्या डावात 78 धावांमध्ये शरणागती पत्करल्यानंतर इंग्लंडने पहिल्या डावात 432 धावा केल्या आणि 355 धावांची आघाडी घेतली. यानंतर हिंदुस्थानने आपला दुसरा डाव सुरू केला. या दरम्यान सलामीवीर खेळाडू रोहित शर्मा याने एक खास विक्रम आपल्या नावे केला.
रोहित शर्मा याने इंग्लंडचा वेगवान गोलंदाज ओली रॉबिन्सन याच्या आखूड टप्प्याच्या चेंडूवर षटकार ठोकला आणि कपिल देव यांचा विक्रम मोडला. या षटकाराच्या मदतीने रोहित शर्मा कसोटी क्रिकेटमध्ये हिंदुस्थानकडून सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्यांच्या यादीत चौथ्या स्थानी पोहोचला आहे. कपिल देव यांच्या नावावर 131 कसोटीत 61 षटकारांची नोंद आहे, तर रोहितच्या नावावरही 42 कसोटीत आता 62 षटकारांची नोंद झाली आहे. पहिल्या स्थानावर विरेंद्र सेहवाग, दुसऱ्या स्थानावर महेंद्रसिंह धोनी आणि तिसऱ्या स्थानावर सचिन तेंडुलकर विराजमान आहे
हिंदुस्थानकडून कसोटीत सर्वाधिक षटकार ठोकणारे खेळाडू
1. विरेंद्र सेहवाग – 90 षटकार
2. महेंद्रसिंह धोनी – 78 षटकार
3. सचिन तेंडुलकर – 69 षटकार
4. रोहित शर्मा – 62 षटकार*
5. कपिल देव – 61 षटकार
6. सौरव गांगुली – 57 षटकार
…म्हणून अश्विनला अंतिम 11 मध्ये संधी नाही, कर्णधार विराट कोहलीने केला खुलासा




























































