INDvsENG – पहिल्या दिवसावर हिंदुस्थानचे वर्चस्व, अक्षरचा बळींचा ‘षटकार’, रोहितचे अर्धशतक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थान आणि इंग्लंड संघातील तिसरा कसोटी सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी मैदानावर सुरू आहे. दिवस-रात्र पद्धतीने होणाऱ्या या कसोटीत इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. इंग्लंडचा पहिला डाव 112 धावांमध्ये गारद केल्यानंतर दिवस अखेर टीम इंडियाने 3 गडी गमावून 99 धावा केल्या आहेत. रोहित शर्मा 57 तर अजिंक्य रहाणे 1 धावा काढून नाबाद आहे.

लाईव्ह अपडेट –

  • अद्यापही 13 धावांनी पिछाडीवर
  • पहिल्या दिवसाखेर टीम इंडियाच्या 3 बाद 99 धावा
  • टीम इंडियाला धक्का, विराट कोहली 27 धावांवर बाद
  • रोहितचे अर्धशतक
  • रोहित-विराटची जोडी जमली, दोघांमध्ये 50 धावांची भागिदारी
  • पुजाराही शुन्यावर माघारी
  • शुभमन गिल 11 धावांवर बाद
  • टीम इंडियाची फलंदाजी सुरू
  • फिरकीपटू अक्षर पटेलने 6, तर अश्विनने घेतल्या 3 विकेट्स
  • इंग्लंडचा संपूर्ण संघ 112 धावांमध्ये बाद
  • इंग्लंडचा नववा धक्का, स्टुअर्ट ब्रॉड 3 धावांवर बाद
  • इंग्लंडच्या 100 धावा पूर्ण
  • इंग्लंडला आठवा धक्का, लीच 3 धावांवर बाद

  • चोफ्रा आर्चर 11 धावांवर बाद
  • इंग्लंडला सातवा धक्का, अक्षरचा बळींचा चौकार
  • इंग्लंडचा सहावा खेळाडू बाद, स्टोक्स 6 धावांवर माघारी
  • ओली पोप 1 धावांवर बाद, अश्विनने त्रिफळा उडवला
  • चहापानानंतर खेळ सुरू
  • बेन स्टोक्स (6) आणि ओली पोप (1) मैदानावर
  • चहापानापर्यंत इंग्लंडच्या 4 बाद 81 धावा

इंग्लंडचा कर्णधार जो रूट याने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रूटचा हा निर्णय टीम इंडियाच्या गोलंदाजांनी चुकीचा ठरवला. आपला 100 वा आंतरराष्ट्रीय कसोटी सामना खेळणाऱ्या इशांत शर्माने सलामीवीर डॉमिनिक सिबली याला शून्यावर बाद करत पाहुण्या संघाला धक्का दिला. यानंतर फिरकीपटू अक्षर पटेल यांने जॉनी बेअरस्टो याला शून्यावर पायचित करत इंग्लंडला बॅकफूटवर ढकलले.

इशांत शर्माची ‘शंभरी’, शहांच्या हस्ते स्पेशल कॅप; तर राष्ट्रपतींनी दिले स्मृति चिन्ह

दोन खेळाडू झटपट बाद झाल्यानंतर सलामीवीर जॅक क्राऊली आणि कर्णधार जो रूट यांनी डाव सावरला. दोघांमध्ये 47 धावांची भागिदारी झाली. या दरम्यान क्राऊली याने आपले अर्धशतकही पूर्ण केले. आर. अश्विन याने ही जोडी फोडली. त्याने रुटला 17 धावांवर पायचित केले. यानंतर अक्षरने स्थिरावलेल्या क्राऊलीला 53 धावांवर बाद केले आणि पहिले सत्र हिंदुस्थानच्या पारड्यात टाकण्यात मोलाचा वाटा उचलला.

रात्रीचे सत्र निर्णायक ठरणार

दिवस-रात्र कसोटी सामना असल्याने अखेरच्या सत्रात रात्री काय नाटय़ घडते यावर या कसोटीचे चित्र अवलंबून असणार आहे. कारण सायंकाळनंतर मैदानावर दव पडायला सुरुवात होते. यावेळी मध्यमगती गोलंदाजांना चेंडूवर पकड ठेवणे नक्कीच थोडे अवघड जाणार आहे.