
रायपूरच्या शहीद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय मैदानावर झालेल्या दुसऱ्या एक दिवसयी लढतीत हिंदुस्थानने न्यूझीलंडचा 8 विकेट्सने दारुण पराभव केला आणि तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली. माफक आव्हानाचा पाठलाग करताना कर्णधार रोहित शर्मा याने 51 धावांची अर्धशतकीय खेळी केली, तर शुभमन गिल याने 40 धावांचे योगदान दिले.
नाणेफेक जिंकून हिंदुस्थानचा कर्णधार रोहित शर्मा याने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हिंदुस्थानच्या वेगवान गोलंदाजांनी कर्णधाराचा हा निर्णय सार्थ ठरवत न्यूझीलंडला एकामागोमाग एक धक्के दिले. त्यानंतर फिरकीपटूंनी यावर कळस चढवत न्यूझीलंडचा डाव 108 धावांमध्ये गुंडाळला.
एकवेळ न्यूझीलंडची अवस्था पाच बाद 15 धावा अशी झाली होती. त्यानंतर ग्लेन फिलिप्स, पहिल्या सामन्यातील शतकवीर ब्लेसवेल आणि सँटनर यांनी थोडाफार संघर्ष केल्याने न्यूझीलंडचा संघ 100 धावांच्या पार पोहोचला. हिंदुस्थानकडून वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने सर्वाधिक तीन बळी घेतले, तर हार्दिक पांड्या आणि वाशिंग्टन सुंदरने प्रत्येकी दोन आणि मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव यांनी प्रत्येकी एक बळी मिळाला.
Innings Break!
A brilliant bowling performance from #TeamIndia 👏 👏
3⃣ wickets for @MdShami11
2⃣ wickets each for @hardikpandya7 & @Sundarwashi5
1⃣ wicket each for @mdsirajofficial, @imkuldeep18 & @imShardScorecard ▶️ https://t.co/tdhWDoSwrZ #INDvNZ | @mastercardindia pic.twitter.com/0NHFrDbIQT
— BCCI (@BCCI) January 21, 2023




























































