
सामना ऑनलाईन । साऊथॅम्पटन
आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप 2019 (World cup 2019)च्या पहिल्या लढतीत हिंदुस्थानच्या फिरकीपुढे आफ्रिकेच्या फलंदाजांनी लोटांगण घातले. फिरकी गोलंदाज युझवेंद्र चहल आणि कुलदीप यादवे पाच पळी घेत आफ्रिकेच्या डावाला खिंडार पाडले. युझवेंद्र चहलने आफ्रिकेच्या चार फलंदाजांना फिरकीच्या जाळ्यात अडकवले. आफ्रिकेचा कर्णधार फाफ डु प्लेसिस (38 धावा), आर.वॅन डेर ड्युसेन (22 धावा), डेव्हीड मिलर (31 धावा) आणि अँडीले फुलक्वायो (34 धावा) या चौघांना पवेलियनचा रस्ता दाखवला, तर कुलदीपने जे पी ड्यूमिनीला (3 धावा) बाद करून चहलला उत्तम साथ दिली.
A brilliant 4-wicket haul to kickstart his #CWC19 campaign #TeamIndia – @yuzi_chahal is our Key Performer after the end of the SA innings #SAvIND pic.twitter.com/b6lJlS6yah
— BCCI (@BCCI) June 5, 2019



























































