
सामना ऑनलाईन,मँचेस्टर
अफगाणिस्तानच्या क्रिकेट संघाला सध्या सुरू असलेल्या वर्ल्ड कपमध्ये आपला ठसा उमटवता आलेला नाही. त्यांना सलग चार पराभवांना सामोरे जावे लागले आहे. याच पार्श्वभूमीवर उद्या त्यांना यजमान इंग्लंडचा सामना करावयाचा आहे. इंग्लंडने चार लढतींमधून तीन विजयांसह सहा गुणांची कमाई केली असून त्यांना चौथ्या विजयाची प्रतीक्षा आहे. अफगाणिस्तानला उद्याचाही पेपर अवघड जाईल ही काळ्या दगडावरील रेघ आहे.
अफगाणिस्तान लढतीआधी इंग्लंडचा प्रमुख खेळाडू जेसन रॉयला दुखापत झाली. त्यामुळे त्याला आगामी दोन सामन्यांमधून माघार घ्यावी लागली आहे. कर्णधार ओएन मॉर्गनलाही दुखापतीमधून जावे लागत आहे. एकूणच काय तर इंग्लंडच्या संघातील खेळाडूंना दुखापतीचा फटका बसलाय. मात्र अफगाणिस्तानचा संघ दुबळा असल्यामुळे निकालावर मोठा फरक पडणार नाही.
आजची लढत- अफगाणिस्तान – इंग्लंड,मँचेस्टर, दुपारी तीन वाजता




























































