
क्रिकेट इतिहासात ‘बॉक्सिंग डे’ कसोटी म्हणून लोकप्रिय असलेल्या आजच्या दिवशी ऑस्ट्रेलियाला 66 षटकांच्या खेळात केवळ 3 बाद 187 धावाच करता आल्या. पावसाच्या व्यत्ययामुळे काही षटकांचा खेळ वाया गेला. तसेच ‘बॉक्सिंग डे’ कसोटीला असलेली क्रिकेटप्रेमींचा विक्रमी गर्दी यंदा 62 हजारांपर्यंत खाली आली.
पाकिस्तानविरुद्ध सलग सोळाव्या विजयासाठी उत्सुक असलेल्या ऑस्ट्रेलियाला आज नाणेफेक जिंकता आली नाही. त्यामुळे पाकिस्तानने नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाला फलंदाजीला बोलावले. शाहिन आफ्रिदीने पहिल्या षटकात टाकलेले आऊट स्विंग पाहून ऑस्ट्रेलियाला सावध खेळ करावा लागणार, याचे संकेत मिळाले होते. आफ्रिदीने आपल्या दुसऱयाच षटकात डेव्हिड वॉर्नरचा झेल काढला होता, पण स्लिपमध्ये उभ्या असलेल्या अब्दुल्ला शफिकला अत्यंत सोपा झेलही टिपता आला नाही.
पहिल्या सामन्यात जीवदानाचा लाभ घेत 164 धावांची खेळी करणारा डेव्हिड वॉर्नर मात्र आज त्या खेळाची पुनरावृत्ती करू शकला नाही. वॉर्नर-उस्मान ख्वाजा जोडीने पहिले सत्र जवळजवळ खेळून काढलेच होते, पण आगा सलमानने उपाहाराच्या शेवटच्या षटकांत वॉर्नरला बाद केले आणि ही जोडी पह्डली.

























































