IND vs WI टेस्ट ‘स्पेशालिस्ट’ची लॉटरी, 2 वर्षानंतर टीम इंडियाच्या वन डे संघात समावेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थान-वेस्ट इंडिज संघांत 6 फेब्रुवारीपासून एकदिवसीय क्रिकेट मालिकेला प्रारंभ होणार आहे. मात्र, त्यापूर्वीचं टीम इंडियावर कोरोनाचा अटॅक झाल्याने कर्णधार रोहित शर्माची डोकेदुखी वाढली आहे. बीसीसीआयच्या संघनिवड समितीने मयांक अग्रवालची 18 सदस्यीय टीम इंडियात समावेश केला आहे. बीसीसीआयने ही माहिती दिली आहे.

हिंदुस्थान- वेस्ट इंडिज दरम्यान तीन एकदिवसीय आणि तीन टी-20 सामन्यांची मालिका होणार आहे. बीसीसीआयने जाहिर केलेल्या पत्रकामध्ये शिखर धवन, श्रेयस अय्यर, ऋतुराज गायकवाड आणि स्टँडबायवर असलेल्या नवदीप सैनी या चौघांना कोरोनाची बाधा झाल्याचे म्हटले आहे. क्षेत्ररक्षण प्रशिक्षक टी. दिलीप, सुरक्षा लायसन अधिकारी बी लोकेश आणि स्पोटर्स मसाज थेरपीस्ट राजीव कुमार यांना कोरोनाची बाधा झाली आहे.

कोरोनाची बाधा झालेले सर्वजण पुढचे सात दिवस आयसोलेशनमध्ये राहणार आहेत. त्यामुळे त्यांना वेस्ट इंडिजविरुद्धच्या सलामीच्या वनडे लढतीत खेळता येणार नाही.

दोन वर्षानंतर कमबॅक

मयांक अग्रवाल याने फेब्रुवारी 2020 ला आपली पहिली वन डे खेळली होती. तर सीडनीमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध 29 नोव्हेंबर 2020 ला शेवटची वन डे खेळली होती. त्यानंतर त्याला वन डे संघात संधी देण्यात आली नाही. आता तब्बल दोन वर्षानंतर त्याचे पुनरागमन झाले आहे.

U-19 WC फायनलपूर्वी टीम इंडियाच्या खेळाडूंना कोहलीने दिला यशाचा गुरुमंत्र, ‘झुम’वरुन संवाद

खराब प्रदर्शन

19 टेस्टमध्ये 1429 धावा असणाऱ्या मयांक अग्रवाल याची वन डे मधील कामगिरी सुमार आहे. पाच वन डे मध्ये त्याने फक्त 86 धावा केल्या आहेत. या दरम्यान त्याला एकदाही अर्धशतकीय खेळी करता आली नाही. मात्र आता मिळालेल्या संधीचा तो कसा फायदा उठवतो हे पाहणे औत्सुक्याचे आहे.