हिंदुस्थान-ऑस्ट्रेलिया मालिकेला चांगला प्रतिसाद, 50 टक्के प्रेक्षकांना स्टेडियममध्ये परवानगी

हिंदुस्थान-ऑस्ट्रेलिया यांच्यामधील क्रिकेट मालिकेला 27 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. दोन देशांमध्ये तीन वन डे, तीन टी-20 व चार कसोटी सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे. दोन देशांमधील वन डे व टी-20 क्रिकेट मालिकेतील लढतींना चांगला प्रतिसाद लाभला आहे. स्टेडियमध्ये 50 टक्के प्रेक्षकांना परवानगी देण्यात आली असून जवळपास सर्व तिकिटे विकली गेली आहेत.

हिंदुस्थान-ऑस्ट्रेलिया यांच्यामधील टी-20 व वन डे लढती सिडनी व पॅनबेरा येथे आयोजित करण्यात येणार आहेत. पहिल्या दोन दिवसांमधील तिकीट विक्रीलाही क्रिकेटप्रेमींचा उत्तम प्रतिसाद लाभला आहे. एका लढतीची अवघी दोन हजार तिकिटे उपलब्ध आहेत. दरम्यान, हिंदुस्थानविरुद्धच्या मालिकेमुळे क्रिकेट ऑस्ट्रेलियाला मोठा नफा होण्याची शक्यता आहे. कोरोनामुळे क्रिकेट ऑस्ट्रेलिया आर्थिक अडचणीत सापडले आहे. या मालिकेमुळे त्यांना उभारी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.

आपली प्रतिक्रिया द्या