हॉकी वर्ल्ड कपमध्ये हिंदुस्थानची दमदार विजयी सलामी, दक्षिण आफ्रिकेचा 5-0ने धुव्वा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । भुवनेश्वर

यजमान हिंदुस्थानच्या हॉकी संघाने बुधवारी दक्षिण आफ्रिकेच्या हॉकी संघाचा 5-0 अशा फरकाने धुव्वा उडवला आणि हॉकी वर्ल्ड कपची दणक्यात सुरुवात केली. सिमरनजीत सिंगने दोन गोल करीत हिंदुस्थानच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. ‘क’ गटातील आणखी एका लढतीत बेल्जियमने कॅनडाला 2-1 अशा फरकाने धूळ चारली.

हिंदुस्थानने पहिल्या क्वार्टरमध्ये आक्रमक खेळ करीत दोन गोल केले. 10 व्या मिनिटाला मनदीप सिंगने आणि 12 व्या मिनिटाला आकाशदीप सिंगने दुसरा गोल केला. दुसऱया क्वार्टरमध्ये दोन्ही संघांना गोल करण्यात अपयश आले. पण पहिल्या क्वार्टरमध्ये केलेल्या दोन गोलच्या जोरावर हिंदुस्थानने हाफ टाइममध्ये 2-0 अशी आघाडी कायम ठेवली. सिमरनजीत सिंगने 43 व 46 व्या मिनिटांना तर ललित उपाध्यायने 45 व्या मिनिटाला गोल करीत हिंदुस्थानला 5-0 अशा फरकाने पुढे नेले. हिंदुस्थानने तिसऱया क्वार्टरमध्ये दोन व अखेरच्या क्वार्टरमध्ये एक गोल केला. आता हिंदुस्थानसमोर 2 डिसेंबरला बेल्जियमचे आव्हान असेल.