हिंदुस्थानी ‘बॉर्डर्स’चा इतिहास लिहिला जाणार

260

हिंदुस्थानी सीमांचा इतिहास लिहिला जाणार आहे. हिंदुस्थानी सीमा पाकिस्तान, चीन, नेपाळ, भूतान, बांगलादेश, मान्यमार या देशांशी जोडलेल्या आहेत. सर्वसामान्य आणि अधिकाऱयांना आपल्या सीमारेषा माहीत व्हाव्यात यासाठी सरकारने हा उपक्रम हाती घेतला आहे. सीमांचा इतिहास लिहिण्यासाठी दोन वर्षांचा कालावधी लागणार आहे.

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी एका बैठकीत या उपक्रमाला मंजुरी दिली. यावेळी भारतीय इतिहास संशोधन परिषद, नेहरू स्मृती संग्रहालय आणि ग्रंथालय, पुराभिलेख खात्याचे महासंचालक, केंद्रीय गृह विभाग आणि संरक्षण खात्यातील अधिकारी उपस्थित होते.

सीमांची संस्कृती अधोरेखित करणार

पुस्तकात सीमांचा शोध, बनणाऱ्या, मिटणाऱ्या आणि पाण्याच्या प्रवाहामुळे बदलणाऱ्या सीमा, सीमा सुरक्षा दलाची भूमिका, सीमाभागांवर राहणारे नागरिक, त्यांची वांशिक सरमिसळ, संस्कृती आणि त्यांच्यावर होणारे सामाजिक-आर्थिक परिणामांचे विविध पैलू यावर या पुस्तकात प्रकाश टाकला जाणार आहे. दरम्यान, या पुस्तकाला आवश्यक असणाऱ्या सर्व गोष्टी उपलब्ध करून देण्याचे आदेश सिंह यांनी दिले.

आपली प्रतिक्रिया द्या