हिंदुस्थान कोरोनावर नियंत्रण मिळविण्यात अपयशी का? चिदंबरम यांचा मोदींना सवाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांत कोरोनाचे संक्रमण रोखण्यात येईल, असा शब्द दिला होता. जगभरातील अन्य देश कोरोना रोखण्यात यशस्वी ठरले. मग हिंदुस्थान कोरोनावर नियंत्रण मिळविण्यात अपयशी का ठरला, असा सवाल कॉँग्रेस नेते माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केला आहे.

कॉँग्रेस नेते चिदंबरम यांनी ट्विट करत याबाबत पंतप्रधान मोदी यांना थेट जाब विचारला आहे. लॉकडाऊनच्या रणनीतीचा फायदा हिंदुस्थान होताना दिसत नाही. पंतप्रधान मोदी यांनी 21 दिवसांमध्ये कोरोनावर मात करू असे सांगितले होते, परंतु तसे काही झाले नाही. जगातील अन्य देश कोरोना रोखण्यात यशस्वी झाले, हिंदुस्थान का नाही? अशी विचारणा चिदंबरम यांनी केली आहे. सप्टेंबरअखेर कोरोना रुग्णांची संख्या 65 लाखांपर्यंत पोहोचण्याची शक्यता असल्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे.