देशभरात 31 लाख लोक क्वारंटाइन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी देशभरात एकूण 31 लाख 60 हजार लोकांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. उत्तर प्रदेशात सर्वाधिक 11 लाखांहून अधिक लोकांना विलगीकरण कक्षात ठेवले असून त्यापाठोपाठ महाराष्ट्रात 7 लाख 27 हजार लोक क्वारंटाईन आहेत. राज्यांच्या यादीत गुजरातचा तिसरा क्रमांक असून येथे 3 लाख 25 हजार लोकांना तर ओडिशात 2 लाख 40 हजार जणांना क्वारंटाइन करण्यात आले आहे.