ब्रिटिश खासदाराला विमानतळावरून परत पाठवले!

453

 जम्मू -कश्मीरला विशेष दर्जा देणारे 370 कलम रद्द केल्यावर केंद्रातील मोदी सरकारवर टीका करणाऱया ब्रिटनच्या मजूर पक्षाच्या खासदार डेबी अब्राहम यांना सोमवारी  दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर रोखत हिंदुस्थानात येण्यापासून मज्जाव करण्यात आला. केंद्राच्या या निर्णयावर ब्रिटिश खासदारांनी प्रश्नचिन्ह उभे केले आहे. डेबी अब्राहम या ब्रिटिश खासदार आणि ऑल पार्टी पार्लियामेंट ग्रुप ऑफ कश्मीरच्या अध्यक्षा आहेत. सोमवारी सकाळी 8.50 वाजता डेबी दिल्ली विमानतळावर पोचल्या. त्यावेळी त्यांचा व्हिसा रद्द झाल्याचे त्यांना विमानतळ अधिकाऱयांकडून सांगण्यात आले. दरम्यान, त्यांचा व्हिसा ऑक्टोबर 2020 पर्यंत वैध असल्याचे नंतर उघड झाले. याप्रकरणी डेबी यांनी तक्रार दाखल केली असून, मी नेहमीच मानवी हक्कांच्या पायमल्लीविरुद्ध आवाज उठवते आणि राजकारणात असेपर्यंत यापुढेही उठवत राहणार असल्याचे सांगितले. मी अधिकृत कागदपत्रे दाखवूनही मला हिंदुस्थानात प्रवेश नाकारण्यात आल्याचे दुःख आहे.

आपली प्रतिक्रिया द्या