आता देशाच्या दुर्गम भागातही डिजिटल पेमेंट करणे शक्य; आरबीआयने केली ही मोठी घोषणा

660

देशात डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार सातत्याने पावले उचलत आहे. अशातच आता देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या रिझर्व्ह बॅंकेने एक मोठा निर्णय जाहीर केला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) ने देशातील दुर्गम आणि अंतर्देशीय भागात डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी शुक्रवारी पेमेंट इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट फंड (पीआयडीएफ) तयार करण्याची घोषणा केली. ज्या ठिकाणी व्यापाऱ्यांकडे यूपीआय, कार्ड, मोबाईल वॉलेट आणि इतर ई-पेमेंटद्वारे पेमेंट रिसिव्ह करण्याची सुविधा नाही. अशा स्तर 3 ते 6 च्या मध्ये येणाऱ्या व्यापाऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे.

याबाबत बोलताना आरबीआयने सांगितले की, हिंदुस्थानला यशस्वी Digital India मध्ये रूपांतरित करण्यासाठी दुर्गम भागातील पायाभूत सुविधांमध्ये आणखी सुधारणा करणे आवश्यक आहे. देशात नवीन पेमेंट इको प्रणाली तयार करणे आणि त्याला गती देण्यासाठी आरबीआय वचनबद्ध असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या इको सिस्टीममध्ये बँक खाती, मोबाईल फोन, कार्ड इत्यादींचा समावेश आहे. आरबीआयने निर्णय घेतला आहे की, पीआयडीएफला प्रोत्साहन देण्यासाठी सुरुवातीला 250 कोटी रुपये खर्च केले जातील.

आपली प्रतिक्रिया द्या