हिंदुस्थानात सोन्याच्या मागणीत लक्षणीय वाढ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जगभरात सोन्याच्या मागणीत वाढ झाली आहे. विशेषत: हिंदुस्थान आणि चीनमध्ये सोन्याला चांगलीच झळाळी मिळाली असून या दोन देशांतील सोन्याच्या मागणीचे प्रमाण जगभरातील मागणीच्या तुलनेत निम्मे आहे. एकटय़ा हिंदुस्थानातील मागणीचे प्रमाण हे वैश्विक मागणीच्या तुलनेत 22 टक्के आहे. सोन्याची मागणी भौगोलिकदृष्टय़ा वैविध्यपूर्ण आहे. जगात उदयोन्मुख बाजारपेठांतून होणाऱ्या सोन्याच्या मागणीचे प्रमाण 72 टक्के आहे. वर्ल्ड गोल्ड काऊन्सिलने आपल्या अहवालात हा निष्कर्ष नोंदवला आहे.