देशात कोरोना रुग्णांची संख्या 68 लाखांच्या पार, मृत्यूदरात घट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गेल्या 24 तासात देशात कोरोनाचे 78 हजारहून अधिक रुग्ण सापडले आहेत त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या 68 लाखांच्यावर गेली आहे. तसेच देशातील मृत्यूदरही कमी झाला आहे.

गेल्या 24 तासात कोरोनाचे 78 हजार 524 रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या 68 लाख 35 हजार 656 वर पोहोचली आहे. तसेच गेल्या 24 तासात 971 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकूण मृतांचा आकडा 1 लाख 5 हजार 526 वर पोहोचला आहे. आतापर्यंत 58 लाख 27 हजार 705 रुग्ण बरे झाले असून 9 लाख 2 हजार 425 रुग्णांचा उपचार सुरू आहे.

मृत्यूदरात घट
कोरोना संकटकाळात एक चांगली बातमी समोर येत आहे. गेल्या काही दिवसांत मृत्यूदरात घट झाली आहे. गेल्या 24 तासात 971 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर मंगळवारी 990 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सोमवारी 886 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्रालयाच्या एका अहवालानुसार गेल्या एक आठवड्यात एक हजारपेक्षा कमी मृत्यू होत आहे. फक्त हिंदुस्थानातच अमेरिका आणि ब्राझीलमध्येही मृत्यूदर घटल आहे.