देशात गेल्या 24 तासात आढळले कोरोनाचे 50 हजारहून अधिक रुग्ण, एकूण रुग्णसंख्या 83 लाखांच्या वर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशात गेल्या 24 तासात 50 हजारहून अधिक रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या 83 लाखांच्या वर गेली आहे.

गेल्या 24 तासात देशात 50 हजार 210 कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या 83 लाख 64 हजार 86 वर पोहोचली आहे. गेल्या 24 तासात 704 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकूण मृतांचा आकडा 1 लाख 24 हजार 315 वर पोहोचला आअहे.

असे असले तरी आतापर्यंत 77 लाख 11 हजार 809 रुग्ण बरे झाले आहेत. देशात सक्रिय रुग्णांची संख्या 5 लाख 27 हजार 962 असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

गेल्या काही दिवसांत सक्रिय रुग्णांची संख्या सातत्याने कमी होत आहे. देशात 4.34 टक्के रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर अमेरिकेत 26 टक्के रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यानंतर फ्रान्सचा क्रमांक लागत असून फ्रान्समध्ये 11 टक्के रुग्णांवर उपचार सुरू आहेत.