
दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या ओमायक्रॉन या व्हेरिएंटमुळे हिंदुस्थानात तिसऱ्या लाटेची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे तिसरी लाट आल्यास ब्रिटनप्रमाणेच हिंदुस्थानात सुद्धा दररोज लाखाच्या संख्येने रुग्ण आढळतील, अशा इशारा नीती आयोगाने दिला आहे. जगभरातील कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
डॉ. पॉल म्हणाले की, ब्रिटनमधील ओमायक्रॉनच्या संसर्गाचे प्रमाण पाहिल्यास आणि हिंदुस्थानच्या लोकसंख्येशी तुलना केली तर, देशात दररोज 14 लाख कोरोना रुग्ण सापडतील. प्रत्येक केसचे जिनोम सिक्वेन्सिंग करणे अशक्य असल्याचेही यावेळी ते म्हणाले.
कोरोनाच्या वाढत्या प्रकरणामागे ओमायक्रॉन संसर्ग मानले जाते आहे, परंतु त्याबद्दल अद्याप सर्व काही स्पष्ट झालेले नाही. यावर संशोधन सुरू असून, सरकार सर्व नवीन घडामोडींवर लक्ष ठेवून आहे. असे म्हटले जात आहे की, ओमायक्रॉन स्ट्रेन फक्त सौम्य संसर्ग पसरवते. त्यांनी युरोपमधील ओमायक्रॉन संसर्गाच्या वेगावर प्रकाश टाकला आणि हिंदुस्थानच्या लोकसंख्येशी त्याची तुलना केली आहे.
जगात दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या हिंदुस्थानात जिनोम सिक्वेन्सिंग करण्यात येत असून, त्यात सातत्याने वाढ करण्यात येत आहे. डॉ. पॉल म्हणाले की, प्रत्येक केसचे जिनोम सिक्वेन्सिंग करणे शक्य होणार नाही. जिनोम सिक्वेन्सिंग हे निरीक्षण आणि साथीच्या रोगाचा आढावा घेण्याचे साधन आहे. रोगाचे निदान करण्याचे साधन नव्हे. पण शक्य तितक्या जास्त नमुन्यांचे जिनोम सिक्वेन्सिंग होईल असे पॉल यांनी सांगितले.
देशात 7 हजार नवे रुग्ण, 84 हजार सक्रिय रुग्ण
हिंदुस्थानात दिवसभरात 7 हजार 81 नवे रुग्ण आढळले आहेत. यादरम्यान सक्रिय रुग्णसंख्येचा आकडा 83 हजार 913 वर पोहचला आहे. देशात आतापर्यंत कोरोना मृत्यूचा आकडा 4 लाख 77 हजार 422 वर पोहचला आहे. दिलासादायक बाब म्हणजे देशातील 3 कोटी 41 लाख 78 हजार 940 नागरिकांनी कोरोनावर मात केली आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार 137 कोटी 46 लाख जणांनी कोरोनाची लस घेतली.
India reports 7,081 new #COVID19 cases, 7,469 recoveries, and 264 deaths in the last 24 hours.
Active cases: 83,913, lowest since March 2020
Total recoveries: 3,41,78,940
Death toll: 4,77,422
Total Vaccination: 1,37,46,13,252 pic.twitter.com/YaSI9n6kt8— ANI (@ANI) December 19, 2021





























































